नागपूर : नागपूरच्या श्रीरामनगर भागात घरगुती वादातून मुलानं वडिलांची हत्या केली आहे. लाकडानं वार करत राहत्या घरी ही हत्या करण्यात आली आहे. घयाडी कुटुंबात झालेल्या वादातून ही घटना घडली.

काल (गुरुवारी) रात्री क्षुल्लक कारणातून वडिलांसोबत आरोपी मुलाचं भांडण झालं. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या रागात मुलानं शेजारी असलेला लाकडाच्या तुकड्याने वार करत वडिलांची हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलगा रागीट स्वभावाचा असल्यानं ही हत्या झाल्याचं सांगितलं आहे.

वडिलांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. नेमकं कोणत्या गोष्टीवरुन या दोघांमध्ये भांडण झालं याचा तपास पोलीस करत आहेत.