नागपुरात लग्नाच्या आदल्या दिवशी पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 24 Mar 2017 10:13 AM (IST)
नागपूर : नागपुरात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पोलिसाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहगाव झिल्प मधील तलावात मृतदेह आढळला. दोन दिवसांपासून राजेश सायरे हा पोलिस कर्मचारी बेपत्ता होता. गुरुवारी याच तलावाजवळ राजेश यांची मोटारसायकल आणि चप्पल आढळून आली होती. त्यानंतर राजेश यांचा मृतदेह सापडला आहे. राजेश सहारे यांचं शुक्रवारी लग्न होतं, पण लग्नाच्या दोन दिवस अधिपासूनच राजेश बेपत्ता होते. त्यातच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेश सायरे नागपूरच्या काटोल पोलिस स्टेशन येथे कार्यरत होते.