नवी दिल्ली : पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत आज संपत होती. मात्र आता या मुदतीत 31 मार्च 2020 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने (सीबीडीटी) हा निर्णय घेतला असून आयकर विभागाने ही माहिती दिली आहे. पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आठव्यांदा वाढवण्यात आली आहे.


आयकर विभाग अधिनियम, 1961 नुसार 139 एए (2) अंतर्गत आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2019 निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ही तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाने याबाबतचं ट्वीट केलं आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) कडून भारतातील प्रत्येक नागरिकाला आधारकार्ड मिळते तर आयकर विभागाकडून पॅनकार्ड मिळते.





इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी पॅनकार्ड आधारकार्डशी जोडणे अनिवार्य आहे. गेल्या वर्षी 7 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या आधार योजनेला संविधानिकरित्या वैध ठरवलं होतं, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने दिली. आयकर कायदाचं कलम 139 एए (2) मधील तरतूदीनुसार 1 जुलै 2017 साली ज्या व्यक्तीकडे पॅनकार्ड होतं आणि जो आधारकार्डसाठी पात्र आहे. त्याने आपला आधारकार्ड क्रमांक कर अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक आहे.


VIDEO | आधारकार्ड पॅनकार्डसोबत कसं लिंक कराल?




VIDEO | पॅन कार्डसाठी वडिलांच्या नावाची आवश्यकता नाही