अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पंचायत समिती निकाल ईश्वरचिठ्ठीने काढण्यात आला. अकोट मधील अकोलखेड गणामध्ये पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेचे सूरज गणभोज आणि काँग्रेसचे दिगंबर पिंप्राळे या दोन्ही उमेदवारांना 1530 मतं मिळाली. यानंतर एका लहान मुलीच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात शिवसेनेचे सूरज गणभोर विजयी झाले. या गणामध्ये वंचितचे उमेदवार निलेश झाडे यांना 1099 तर एका अपक्ष उमेदवाराला 149 मतं मिळाली.
अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकालात वंचितची बाजी
अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकालात वंचितची बाजी मारली आहे. 14 पैकी सहा जागा जिंकत वंचितनं सत्ता राखली आहे. आता वंचितच्या एकूण 22 जागा झाल्या आहेत.
अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष4) अंदूरा : मीना बावणे : वंचित5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित8) बपोरी : माया कावरे : भाजप9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित11) दगडपारवा : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार14) तळेगाव बु. : संगिता अढाऊ : वंचित
एकूण जागा : 14निकाल जाहीर : 14
वंचित : 06अपक्ष : 02शिवसेना : 01राष्ट्रवादी : 02भाजप : 01काँग्रेस : 01प्रहार : 01