मुंबई : सर्व पक्षांचे आणि राज्यपालांचे आभार मानतो. राज्यात स्थिर सरकाराची सध्या आवश्यकता आहे. महाविकासआघाडीच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात राज्याला नवी दिशा मिळणार आहे. हीच ती वेळ आहे नवा महाराष्ट्र घडवण्याची. पुढील पाच वर्षाच महाराष्ट्राल नवी दिशा मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.


सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण द्यावे असे पत्र आपण त्यांना दिले. 28 तारीख मागितली, उद्धव यांचा शपथविधी होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, आम्ही राज्यपालांना भेटलो. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव टाकला आहे. 28 तारखेला उध्दव ठाकरे शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित दादा, आत्राम आणि अवसारे यांची सही नाही. पण आमच्या कवरिंग लेटर मध्ये मात्र आम्ही 54 आमदारांचा समावेश केला आहे. त्यात अजित पवार ही आले आहेत. ते आमचे नेते आहेत. अजित पवार हे आमच्या पार्टीचे नेते आहेत. ते कधीच बाहेर नव्हते असे आम्ही मानतो. त्यांना आम्ही जो आग्रह केला, तो त्यांनी मानला असे आम्ही समजतो. ते भाजपकडे गेले की भाजप त्यांच्याकडे हे मला माहित नाही.

सर्व आघाडीच्या घटक पक्षांची सह्यांची पत्र राज्यपालांना सादर केलेली आहेत. उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंदर्भात राज्यपालांना विनंती केलेली आहे. 28 तारखेला शपथविधी संध्याकाळी पाच वाजता होईल. उद्या सकाळी सर्व आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रमात विधानभवनात होणार आहे. मी अजित पवारांना यापूर्वी दोन वेळा भेटलो आहे, आज त्यांची माझी भेट झालेली नाही. ते सिल्वर ओकला गेलेले आहेत तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे.सर्व ठीक होईल अजित पवार हे राष्ट्रवादीचा एक भाग आहेत. त्यांनी कधीही राष्ट्रवादी सोडलेली नाही. राज्यपालांना सादर केलेल्या पत्रामध्ये अजित पवारांची सही झालेली नाही कारण ते आज संध्याकाळी झालेल्या बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र भविष्यात ती सही होईल. भाजपने अजित पवारांना बोलावलं असेल म्हणून तर सरकार स्थापन झालं होतं.