मुंबई : राज्यात पारा हळूहळू खाली घसरत असून नाशिक आणि निफाडमध्ये तर तब्बल 10 अंश सेल्सियस तापमानांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. नाशिकसह मुंबई, पुण्यातही राज्यभर चांगलीच थंडी जाणवू लागली आहे.


वाढत्या थंडीमुळे आता स्वेटर, कानटोपीसारखे गरम कापडे कपाटातून बाहेर काढायची वेळ आली आहे. दरम्यान पुण्यात 11 अंश सेल्सियस तर नागपूर, अकोला आणि परभणीत सुमारे 12 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं आहे.

नाशकात गुलाबी थंडी

नाशिक शहरात आजचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या नाशिककर गुलाबी थंडी अनुभव आहेत. अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरलेलीही पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात पारा आणखी खाली जाईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.