अहमदनगर : सरकारकडे बुलेट ट्रेनसाठी पैसा आहे, मात्र महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय, असे म्हणत शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या दृष्टीकोनाचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली.
सरकार सोळा कौटुंबिक न्यायालय स्थापल्याची जाहीरात करतं. मात्र दोन वर्षांतलं हे यश नसून 2006 पासून पाठपुरावा केल्यानं शक्य झाल्याचं गोर्हे यांनी म्हटलं. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी गोऱ्हे यांनी महिलांवरील अत्याचार आणि हत्येच्या खटल्यात आरोपींना लवकर शिक्षेसाठी वरीष्ठ न्यायालयात जलदगती न्यायालयात सुनावणीची गरज व्यक्त केली.
शिक्षेनंतर आरोपी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करतात. त्यामुळे आरोपींच्या शिक्षेला विलंब होत आहे. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयात महिला अत्याचाराच्या खटल्यात जलदगती न्यायालयात सुनावणीची गरज त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर संरक्षण विभागातील महिलांवर नागरिकांकडून अत्याचार झाल्यावर पीडितेला वैद्यकीय सुट्टी मिळत नाही. त्यामुळे शारीरिक दुखापत आणि वैद्यकीय मदतीचा समावेश करण्याची मागणी गोर्हे यांनी केली.
तर पोक्सो न्यायालयात लहान मुलं आणि मुलींना अश्वासक वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. बालकांची व्हिडिओ कॉन्फरन्सनं साक्ष घेण्याची गरज गोर्हे यांनी व्यक्त केली. महिलांच्या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं ही त्यांनी म्हटलं.
सभागृहात महिला आमदार कमी असून मी एकटी पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. इतर महिला आमदारांनी पाठपुरावा करण्याची गरज गोर्हे यांनी व्यक्त केली.
यावेळी गोर्हे यांनी सरकारच्या जाहीरतीवरही नाराजी व्यक्त केली. सरकार सोळा ठिकाणी कौटुंबिक न्यायालय स्थापल्याची जाहीरात करतं. मात्र केवळ दोन वर्षात ही न्यायालयं स्थापन झाली नसून 2006 पासून वारंवार पाठपुरावा केल्याचं त्यांनी म्हटलं.
यावेळी गोर्हे यांनी सरकारवर बोलताना पूर्वीच्या सरकारसारखं आमच्यात सख्य नसल्याची कबुली दिली. अघाडी सरकारच्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर जनतेला न्याय देण्याची अपेक्षा होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलोय, मात्र आमचं हिंदुत्व सनातनी नसल्याचं ही त्यांनी म्हटलं.
कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या, जीएसटी, नोटाबंदीनं समाजात नाराजी आहे. त्यामुळे सेना अंशतः समाधानी असून अस्वस्थता कायम असल्याचं म्हटलं.
यावेळी गोऱ्हे यांनी पोलिसांवर ही निशाणा साधला. सध्या गुन्ह्यांच्या दोष सिद्धीचा रेट 57 टक्केवर आला आहे. मात्र काही पोलीस अधिकाऱ्यांना अहंकार आणि गुर्मी आहे, असा आरोप गोऱ्हेंनी केला. नगरच्या पोलीस अधीक्षकांना कारवाईनंतर बढती मिळण्यामागे लक्ष्मी दर्शन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
बुलेट ट्रेनसाठी पैसा, मात्र महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष : निलम गोऱ्हे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Nov 2017 07:44 PM (IST)
कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या, जीएसटी, नोटाबंदीनं समाजात नाराजी आहे. त्यामुळे सेना अंशतः समाधानी असून अस्वस्थता कायम असल्याचं म्हटलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -