मागील 10 वर्षात महाराष्ट्रातील 101 जवान शहीद, मोदी सरकारच्या कार्यकाळात 55 जवानांना वीरमरण
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा | 05 Mar 2019 10:22 PM (IST)
काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील 44 जवान शहीद झाले आहेत. त्यापैकी 33 जवान नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यापासून शहीद झाले आहेत. 51 जवान 20 टक्के ते 70 टक्क्यांपर्यंत अपंग झाले आहेत.
NEW DELHI, INDIA - OCTOBER 27: Chief of Army Staff, General Bipin Rawat along with the senior officer pay homage to the Martyrs on the occasion of 72nd Infantry Day, at the Amar Jawan Jyoti, India Gate, on October 27, 2018 in New Delhi, India. To honour the supreme sacrifice of the infantry in fighting the Pakistani raiders in Jammu and Kashmir in 1947, Army celebrated Infantry Day with traditional solemnity and gaiety all across the Northern Command. (Photo by Sushil Kumar/Hindustan Times via Getty Images)
मुंबई : मागील दहा वर्षात देशाचं रक्षण करताना महाराष्ट्रातील एकूण 101 जवान शहीद झाले असल्याचं माहिती अधिकारात स्पष्ट झालं आहे. शिवाय काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील 44 जवान शहीद झाले आहेत. त्यापैकी 33 जवान नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यापासून शहीद झाले आहेत. 51 जवान 20 टक्के ते 70 टक्क्यांपर्यंत अपंग झाले आहेत. जम्मू काश्मीर विषयक मोदी सरकारचे धोरण आक्रमक आहे. त्यामुळे जवानांची अधिक हानी झाली, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या टीमने माहिती अधिकाराचा वापर केला. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील किती जवान शहीद झाले याची माहिती मिळावी, यासाठी राज्य सैनिक कल्याण विभागाकडे माहिती अधिकारामार्फत मागणी करण्यात आली होती. दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ही माहिती मिळाली आहे. 1 जून 2009 ते 31 मे 2018 पर्यंतची ही आकडेवारी आहे. दहशतवादी प्रशिक्षण थांबवण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केले. पॅलेट गन्सचा झालेला वापर चांगलाच वादग्रस्त ठरला होता. याच वाढत्या तणावामुळे 2017 या वर्षामध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक सतरा जवान जम्मू काश्मीरमध्ये शहीद झाले आहेत. दहा वर्षात सातारा जिल्ह्यातील 17, कोल्हापूरचे 14 , सांगलीचे 8 जवान शहीद झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन चनशेट्टी यांनी या जवांनापैकी किती जवानांच्या कुटुंबांचं पुर्नवर्सन झालं आहे? याचीही माहिती विचारली होती. परंतु ही वैयक्तिक माहिती असल्याचं सांगत सैनिक कल्याण विभागाकडून माहिती देण्यात आली नाही. साल शहीद अंपग 2009 10 17 2010 14 04 2011 08 02 2012 06 05 2013 08 08 2014 10 06 2015 08 05 2016 13 04 2017 20 निरंक 2018 04 निरंक या ऑपरेशनमध्ये जवान शहीद झाले आहेत. ऑपरेशन मेघदूत ऑपरेशन रक्षक, जम्मू कश्मिर ऑपरेशन ऑर्चीड ऑपरेशन बीआय दहशतवाद्यांशी सामना ऑपरेशन फाल्कून सुदानमध्ये शांती सेना