एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 05 मार्च 2019 | मंगळवार

  1. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे राष्ट्रवादी काँग्रेससोबत, मनसेसाठी राष्ट्रवादीने कल्याणची जागा सोडल्याची सूत्रांची माहिती, उमेदवारीसाठी राजू पाटील आणि रमेश पाटील यांची नावं चर्चेत https://goo.gl/X9ahqD


 

  1. सुपारी घेऊन मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांना आवाहन https://goo.gl/SaEKrD सर्व 22 उमेदवार जाहीर केलेल्या जागांची मुंबईतील बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मागणी https://goo.gl/1BqfDo


 

  1. अहमदनगरमध्ये लोकसभेसाठी सुजय विखे-पाटील राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा, मात्र काँग्रेस नेतृत्त्वाकडे अजून कोणताही प्रस्ताव नाही, राधाकृष्ण विखे-पाटलांचं स्पष्टीकरण https://goo.gl/2NjGCH सुजय विखेंचा निर्णय 7 मार्चला, शरद पवारांची माहिती


 

  1. स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी मातंग समाजातील युवकाची तलावात उडी मारत आत्महत्या, मुख्यमंत्र्यांच्या नावाने व्हिडीओ संदेश, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना https://goo.gl/4Vz2Rk


 

  1. शक्ती मिल बलात्कार प्रकरणी फाशीच्या शिक्षेला दिलेल्या आव्हानावरील युक्तिवाद पूर्ण, मुंबई उच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला https://goo.gl/kSchHB


 

  1. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते उद्घाटन, विमानतळासाठी 520 कोटींचा खर्च https://goo.gl/SDXF6y


 

  1. मराठा क्रांती मोर्चाच्या औरंगाबादेतील बैठकीत गोंधळ, दोन गट एकमेकांना भिडले, संजय भोर आणि विनोद पोखरकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी https://goo.gl/etQGAk


 

8.   कॉपीमुक्त अभियानाला हरताळ, लातूरसह बीडमध्ये दहावी इंग्रजीचा पेपर व्हॉट्सअॅपवर वायरल, पोलिसांसमोरच कॉपीबहाद्दरांची खुलेआम कॉपी https://goo.gl/jwidqo

  1. मुंबईतील गिरगाव आणि जुहू चौपाटीला 'क्लीन स्ट्रीट फूड हब'चा दर्जा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन https://goo.gl/pZd7bh


 

  1. विराट कोहलीचं नागपूर वनडेत कारकीर्दीतलं चाळिसावं शतक साजरं, सचिनचा विक्रम नऊ शतकं दूर, भारताचं ऑस्ट्रेलियाला 251 धावांचं आव्हान https://goo.gl/GaMz61


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK