Sanjay Raut on Disha Salian: दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली आहे.  चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचा 9 जून 2020 रोजी मालाड येथील इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.दिशा सालियनच्या वडिलांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या एसआयटी (विशेष तपास पथक) किंवा सीबीआयकडून करावी अशी मागणी केली होती. आता महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयाला वाव नाही. तसेच, आदित्य ठाकरे देखील निर्दोष आहेत.

Continues below advertisement


राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी


दरम्यान, आदित्य ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या मंत्री नितेश राणेंवर शिवसेना खासदार संजय राऊत कडाडून प्रहार केला. संजय राऊत म्हणाले, नारायण राणेंचा मुलगा आहे ना त्याला टिल्ल्या म्हणतात, नेपाळ्यासारखा बडबडत असतो मला त्याचं नाव माहीत नाही, त्यानं नाक घासून माफी मागितली पाहिजे. फडणवीस आणि शिंदे यांनीही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. आदित्य ठाकरेंना निर्दोष असतानाही अडकवण्याचा प्रयत्न झाला, असे राऊत म्हणाले. 



राजकीयदृष्ट्या दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला  


दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे की त्यांच्या मुलीवर क्रूरपणे बलात्कार करण्यात आला आणि नंतर त्याची हत्या करण्यात आली आणि ती राजकीयदृष्ट्या दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. बलात्कार आणि हत्येत आदित्य ठाकरेंचीही भूमिका आहे, म्हणून त्याच्याविरुद्धही एफआयआर नोंदवावा. राज्य सरकारच्या वतीने मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी उत्तर दाखल केले. त्यांनी सांगितले की याचिकेत लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत. त्यांनी सांगितले की वैज्ञानिक तपासणी आणि पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.


संपूर्ण प्रकरण काय आहे?


दिशा सालियनच्या गूढ मृत्यूचे प्रकरण हाय-प्रोफाइल आणि वादग्रस्त आहे. 2022 मध्ये महाराष्ट्र विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता आणि चौकशीची मागणी केली होती. यावर सभागृहात आमदारांचा बराच गोंधळ झाला. या प्रकरणात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याबद्दलही बोलले होते. प्रत्यक्षात, दिशा सालियन एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंग राजपूत, भारती सिंग अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले होते. ती टीव्ही अभिनेता रोहन रायला डेट करत होती आणि तिच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी तिचे लग्नही झाले होते.


8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मुंबईतील मालाड येथील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा आरोप आहे. तिच्या मृत्यूच्या काही दिवसांनी, 14 जून रोजी, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे प्रकरणही समोर आले. अशा परिस्थितीत, दोन्ही प्रकरणे एकमेकांशी जोडलेली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियनच्या मृत्यूला आत्महत्या म्हटले होते. पोलिसांनी म्हटले आहे की ती अनेक कारणांमुळे नैराश्याने ग्रस्त होती, ज्यामुळे तिने आत्महत्या केली.


इतर महत्वाच्या बातम्या