Sanjay Raut on Nashik BJP: ज्यांच्यावर गंभीर आणि देशद्रोहाचे आरोप करायचे त्यांनाच पावन करून पक्षामध्ये घ्यायचं की मालिका भाजपमध्ये सुरूच आहे. आता नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या विविध नेत्यांवर भाजप नेत्यांकडून गंभीर आरोपांची मालिका करण्यात आली, इतकेच नव्हे तर देशद्रोहाचा सुद्धा आरोप करण्यात आला अशा नेत्यांना नेत्यांना पावन करून घेत पक्षामध्ये प्रवेश दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत घनाघाती प्रहार केला आहे.
नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात गेले. पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. क्लायमॅक्स असा आहे की हे सगळे फरार (भाजपसाठी गुन्हेगार) आता भाजपसाठी प्रवेश करत आहेत. जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सत्ता पैसा दहशत, दुसरं काही नाही असे म्हणत त्यांनी जोरदार प्रहार केला आहे. ट्विटमध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शिवसेनेमध्ये मोठी पडझड सुरू आहे. एका मागोमाग एक शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, तसेच शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची स्थिती दयनीय झाली आहे. नाशिकमधील पडझडीवरून संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. काल नाशिकमधील वादग्रस्त सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर व्यंकटेश सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणांमध्ये कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले माजी आमदार अपूर्व यांचा सुद्धा मुंबईमध्ये भाजप प्रवेश झाला.
इतर महत्वाच्या बातम्या