अहमदनगर : अहमदनगरला चोरट्यांनी चक्क एटीएमचं मशीनच लांबवलं आहे. एमआयडीसी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रचं एटीएम होतं. त्यामध्ये तब्बल 2 लाख 33 हजाराची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महाराष्ट्र बँकेचं हे पोर्टेबल एटीएम होतं. जे बुधवारी रात्रीच भामट्यांनी लांबवलं मात्र, गुरुवारी दुपारी एटीएम गायब झाल्याचं बॅक प्रशासनाच्या लक्षात आलं.
विशेष म्हणजे चोरट्यांनी आधी एटीएममधला सीसीटीव्ही कॅमेरा तोडला आणि नंतर स्कॉर्पिओ गाडीत एटीएम मशीन टाकून ते पसार झाले. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला असला तरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात ही चोरी कैद झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या या चोरट्यांचा शोध सुरु आहे.
अहमदनगरमध्ये चोरट्यांनी थेट ATM मशीनच पळवलं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2017 08:30 AM (IST)
अहमदनगरमध्ये चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच पळवलं असून त्याआधी सीसीटीव्हीची तोडफोडही केली आहे. त्यामुळे या चोरट्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -