जळगाव : लग्न झाल्यानंतरही गावातील प्रियकराशी प्रेम संबध ठेवण्याचा हट्ट करणाऱ्या मुलीची तिच्या पित्यानेच गळा आवळून हत्या केली. 26 जुलैच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर स्वत: आरोपी पिता पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने घटनेची कबुली दिली.


या घटनेसंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील आरोपी असलेल विश्वास पाटील यांच्या मुलीचे गावातील एका मुलाशी प्रेमसंबध होते. मात्र घरच्यांनी गेल्या वर्षी तिचे लग्न करुन दिले होते. लग्न झाल्यानंतर सुद्धा ती गावातील मुलासोबत पळून गेली होती. त्यामुळे बदनामी झाली. परत आल्यावर तिला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने मी ‘त्या’ मुलाबरोबरच राहणार असा हट्ट धरला होता.

मुलगी आपले ऐकत नाही, आपली बदनामी झाल्याचा राग आल्याने   27 तारखेच्या रात्री  1 ते 1.30  वाजण्याच्या सुमारास  झोपलेल्या मुलीचा पित्याने दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपी स्वत: पोलिसात हजर झाला. या प्रकरणी आरोपी विश्वास पाटील यांना अटक करण्यात आली आहे.