जळगाव: भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं, याचा प्रत्यय महाडचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे.


 

ज्या दिवशी महाडचे दुर्घटना घडली, त्या दिवशीच रवींद्र शिंदे यांना तेथील बचाव कार्यास मदत करण्याची जबाबदारी पोलीस दलाने दिली. ही जबाबदारी पार पडत असताना कल्याण येथे राहत असलेल्या त्यांच्या वडिलांची तब्बेत जास्त झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान चौथ्या दिवशी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

मात्र, वडिलांच्या मृत्यूनंतरही भावनपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून शिंदे यांनी बचाव कार्य सुरूच ठेवल्याने त्यांच्या कर्तव्य दक्षतेचे सर्व थरातून आता स्वागत होत आहे.