निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2017 04:55 PM (IST)
मुंबई : राज्यभरातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. महापालिकेचं मतदान एकाच टप्प्यात 21 फेब्रुवारीला होत असून 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदांसाठी 16 फेब्रुवारीला मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यात 10 जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होईल. दोन्ही टप्प्यांसाठी 23 फेब्रुवारीलाच मतमोजणी होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्त्वाचे मुद्दे 1. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आतापासून आचारसंहिता लागू 2. ज्या जिल्ह्यात महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक नाही तिथे विकासाचं काम करण्यावर बंधन नाही 3. 14 फेब्रुवारीपासून एक्झिट पोल घेण्यास बंदी 4. निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडायचं 5. निवडणूक झाल्यानंतर झालेला खर्च 30 दिवसाच्या आत निवडणूक आयोगाकडे जमा करावा 6. महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होते, ही शोभणारी बाब नाही. बँक, एनजीओ, कॉर्पोरेट कंपनी अशा सर्व माध्यमातून प्रसार करणार 7. महापालिकेसाठी 19 फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून प्रचारबंदी 8. हॉटेल, रेस्टॉरंट यांनी आश्वासन दिलं, मतदान करणाऱ्यांना बिलावर सवलत मिळणार 9. नागपुरातील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांना राज्य सरकारने नगर परिषद, नगर पंचायत घोषित केलं. कोर्टात चॅलेंज केल्यामुळे नागपुरातील जिल्हा परिषदेची निवडणूक वगळली 10. नगरपालिका निवडणुकीत 10 कोटी रुपयांची दारु जप्त, 10 हजार जणांना तडीपार, दोन हजार जणांविरोधात फौजदारी कारवाई जिल्हा परिषद पहिला टप्पा (गुरुवार 16 फेब्रुवारीला मतदान) (15) औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली (दोन्ही टप्प्यात) जिल्हा परिषद दुसरा टप्पा – (मंगळवार 21 फेब्रुवारीला मतदान) (11) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली (दोन्ही टप्प्यात) जिल्हा परिषद : पहिला टप्पा अर्ज करण्याची मुदत : 27 जानेवारी – 1 फेब्रुवारी मतदान : गुरुवार 16 फेब्रुवारी जिल्हा परिषद : दुसरा टप्पा अर्ज करण्याची मुदत : 1 फेब्रुवारी – 6 फेब्रुवारी मतदान : मंगळवार 21 फेब्रुवारी दोन्ही टप्प्यांची मतमोजणी : गुरुवार 23 फेब्रुवारी दहा महापालिका 1. मुंबई 2. पुणे 3. पिंपरी चिंचवड 4. ठाणे 5. उल्हासनगर 6. नाशिक 7. नागपूर 8. अकोला 9. अमरावती 10. सोलापूर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम अर्ज दाखल करण्याची मुदत : 3 फेब्रुवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत : 7 फेब्रुवारी मतदान : मंगळवार 21 फेब्रुवारी मतमोजणी : गुरुवार 23 फेब्रुवारी निवडणुकीचं बिगुल वाजलं असलं तरी शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात युती-आघाडी होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.