Rain Alert: नैऋत्य मोसमी पावसाची आता देशाच्या उत्तरेकडून माघार होत असून राजस्थान व कच्छच्या काही भागातून पावसानं एक्सीट घेतली आहे. दरम्यान, राज्यातूनही पाऊस माघारी फिरण्याच्या मार्गावर असून परतीचा पाऊस राज्याला झोडपून काढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण गोव्यात येत्या तीन दिवसात जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचं हवामान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.


या आठवड्यात राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम सरींची हजेरी रहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. २४ ते २७ सप्टेंबरपर्यंत मध्य भारताता मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा


मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात  २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून  आजपासून (दि २३) मराठवाड्यातीील काही भागात तीव्र पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं संपूर्ण राज्याला आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला असून मंगळवारपासून मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.




येत्या २४ तासांत इथे तीव्र पावसाचा अंदाज


येत्या २४ तासांत हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  कोकणातील मुलडे जिल्हा सिंधुदूर्ग, सांगलीतील कसबेदिग्रज, साताऱ्यातील कराड तर कोल्हापुरातील गगनबावडा या भागात मुसळधारांचा इशारा आहे. मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये जोरधारांचा अंदाज देण्यात आला आहे. 


कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?


आज हवामान विभागाने संपूर्ण राज्याला पावसाचा यलो अलर्ट दिला असून उद्यापासून दि २४ सप्टेंबरपासून कोकणासह मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर दोन दिवस जोरदार पाऊस राहणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. दरम्यान हवामान विभागाचे पुणे प्रमुख के एस होसाळीकर यांनी आजचा हवामान अंदजा x माध्यमावर पोस्टही केला आहे.


 






पुढील ३ दिवस मुसळधार


हवामान विभागाने पुढील तीन दिवस महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा अलर्ट दिला असून कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.