औरंगाबाद : अवैध गर्भपात केंद्राचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आपत भालगाव येथे 20 हजारात गर्भपात केला जात होता. एका महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी छापा टाकत हे अवैध गर्भपात प्रकरण समोर आणलं आहे.

आपत भालगावातील एका घरात हे गर्भपात केंद्र चालत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डॉक्टर नसलेली एक महिला या ठिकाणी प्रसूती आणि गर्भपात करत होती.

याबाबत पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय.  एमटीपी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून गर्भपाक करणाऱ्या बोगस डॉकटरलाही ताब्यात घेण्यात आलं.

गर्भपातासाठी जबरदस्ती करण्यासाठी करणाऱ्या नवऱ्यासहित सासू-सासऱ्यांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.