नाशिकमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठकीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
गळ्यावर चाकू ठेवला तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी एका जाहीर सभेत बोलले होते. त्यानंतर यावरुन वाद निर्माण झाला. यानंतर दारुम उलूमने मुस्लिमांनी भारत माता की जय म्हणायचं नाही, असा फतवा काढून या वादाला आणखी हवा दिली.
काही नेते भारत माता की जय का म्हणणार नाही, असं बोलतात. पण अनेक पक्षांचे नेते त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतात. मात्र अशा लोकांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टीका केली.
पाहा व्हिडीओ