मुंबई : पूजा चव्हाण  मृत्यू प्रकरणानंतर आता वनमंत्री संजय राठोड  यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांचा आणि स्वकीयांचाही संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत दबाव आहे. भाजपने तर संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा दिलाय. त्यामुळे संजय राठोड आज मुख्यमंत्र्याकडे राजीनामा सोपवतील अशी दाट शक्यता आहे. मात्र संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त मंत्रीपद कुणाला मिळणार यासाठी आता लॉबिंग सुरु झालं आहे.


संजय राठोडांनंतर मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात?


मंत्रिपदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु झालं आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भाला मंत्रिपद मिळणार की मुंबईला? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भातून मंत्रिपद गेल्यानंतर मंत्रिपद पुन्हा पूर्व आणि पश्चिम विदर्भाला मिळालं पाहिजे, असा जोर येथील नेत्यांचा आहे. संजय राठोड  यांच्या राजीनाम्यासाठीही येथील नेत्यांना मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला होता.


संजय राऊतांचं संजय राठोडांच्या राजीनाम्यासंदर्भात सूचक ट्वीट? शिवरायांचा फोटो शेअर करत राजधर्माची आठवण


दुसरी शक्यता म्हणजे, उद्धव ठाकरे यांचे निकवर्तीय समजले जाणारे नेते, आमदार यांनाही संधी मिळू शकते. म्हणजे मुंबईला हे मंत्रिपद मिळू शकतं. किंवा मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्यावर या विभागाचा अतिरिक्त भार दिला जाऊ शकतो. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्या आधीच विविध नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.


वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर विदर्भातच मंत्रीपद देण्याचा निर्णय झाल्यास संजय रायमूलकर, गोपीकिशन बाजोरिया आणि नितीन देशमुख यांच्यात स्पर्धा असेल. यासोबतच  सध्याचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देऊन विदर्भातील आमदाराला राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर राठोडांना फाडून काढलं असतं, खुर्ची एवढी वाईट आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल


राजीनाम्यासंदर्भात संजय राऊतांच सूचक ट्वीट


संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत राजधर्माची आठवण करुन दिली. मात्र त्यांचं हे ट्वीट कुणासाठी आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!"





संजय राठोड राजीनामा देणार नाहीत- अतुल भातखळकर


संजय राठोड  राजीनामा देण्याची शक्यता कमी आहे. संजय राऊत यांनी राजधर्माची आठवण करून दिलेली नाही, फक्त मीडिया मॅनेजमेंट करण्याचा प्रकार शिवसेनेकडून सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांची केव्हाच मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी होती. मात्र शिवसेनेचा सुसंस्कृतपणाचा बुरखा कायम रहावा, यासाठी ही तडफड सुरु आहे. मात्र शिवसेनेचा खरा चेहरा गेल्या वर्षभरात कायम समोर येत आहे आणि संजय राठोड प्रकरण त्यातील उच्चांक आहे, अशी टीका भाजप खासदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.


Pooja Chavan Death Case | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे लष्कर कोर्टात खटला दाखल


#SanjayRathod अधिवेशनाआधी संजय राठोडांचा राजीनामा? सरकारची नामुष्की झाल्याने मोठा निर्णय होणार?