मुंबई : 'काँग्रेस न होती तो क्या होता' या पुस्तकाचे आज प्रकाशन राज्याचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (17 मार्च) होणार आहे. हाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला. या पुस्तकाच्या लेखिका मला माहित नाही कोण आहेत, त्या संघ परिवाराच्या आहेत की कोण मला माहिती नाही, पण या देशात काँग्रेस नसते तर स्वातंत्र्यच मिळालं नसतं. स्वातंत्र्य लढ्यात अनेक नेते काँग्रेसचे उतरले आणि ब्रिटिशांविरोधात लढा दिला. काही मतभेद आपले असू शकतात. मात्र, काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावा लागली असती, अशी टीका राऊत यांनी केली. 


अखंड हिंदुस्तानची भाषा करता, त्यात मणिपूर येत नाही का?


संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊ शकतात हे या देशाची जनता विसरणार नाही. राहुल गांधी मणिपूरमध्ये राहिले, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्याप माणिपूरला जाऊ शकले नाही याचे कारण काय? तुम्ही अखंड हिंदुस्तानची भाषा करता त्यात मणिपूर येत नाही का? देशाचा पंतप्रधान म्हणजे एक अशी व्यक्ती बसली आहे त्याला गुजरातच्या पलीकडे देश दिसत नाही, त्यामुळे 2024 मध्ये कायमस्वरूपी त्यांना गुजरात मध्ये पाठवण्याचा जनतेने घेतल्याचा टोला राऊत यांनी लगावला. 


हे सत्य त्यांनी स्वीकारल पाहिजे, काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व भेटले नसते.  हा देश बुवा महाराज तंत्र मंत्र जादू मंत्र यांच्याकडे गेला आहे. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनी या देशाला तुमच्या हातातला मोबाईल इंटरनेट दिले. काँग्रेस नसता तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले ते मोदी यांना बाप जन्मात जमलं नसतं, असेही ते म्हणाले. भाजपने  कायम काँग्रेसचे ऋण मानले पाहिजे, असेही ते म्हणाले. 


आम्ही 4 जागांची ऑफर दिली


दरम्यान, जागावाटपावर आज किंवा उद्या घोषणा करू, असे राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला आम्ही 4 जागांची ऑफर आम्ही दिली आहे. आमची त्यांच्याशी प्रस्ताव संदर्भात चर्चा सुरू आहे, आजच्या भाषेत डायलॉग असे म्हणत आहे. संविधान संकटात असताना सर्वजण आपण समाजाने एकत्र यावे वंचितांचे देखील तीच इच्छा आहे.  मी चार जागा संदर्भात प्रस्ताव दिला आहे त्यावर ते विचार करतील, असेही त्यांनी सांगितले. 


आमश्या पाडवी शिंदे गटात जाणार असल्याचा चर्चेवर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अशा लोकांना योग्य प्रवाहात आणण्याचा काम केलं. मला त्यांच्याविषयी फार निर्णय माहिती नाही. मात्र, हे सर्व लोक सोडून गेलेले हे दुर्दैव आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या