लोकसभा निवडणुकीपूर्वी नारायण राणे यांना काँग्रेसकडून पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तसेच दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राणे यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचीही चर्चा झाली होती. परंतु या सगळ्या अफवा असल्याचे राणे यांनी आज स्पष्ट केले.
Chikhalikar Meet Rane | सगळ्यांचा बदला घेतला...अशोक चव्हाणांच्या पराभवावर प्रताप चिखलीकरांचे नारायण राणेंसमोर उद्गार | ABP Majha
नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी राणे आज दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीपूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राणे यांना काँग्रेस प्रवेशाविषयी विचारले होते. त्यावर राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
राणे म्हणाले की, "माझा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही, मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, ज्या बातम्या सर्वत्र पसरत आहेत. त्या सर्व खोट्या आहेत."
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसने सध्या पक्षावर नाराज असलेल्या, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. नारायण राणे हे राज्यातल्या मोठ्या नेत्यांमध्ये गणले जातात. त्यामुळे राणेंना स्वगृही परत आणण्यास काँग्रेस प्रयत्नशील आहे. परंतु काँग्रेसमध्ये जाण्याच्या सर्व शक्यता राणेंनी फेटाळल्या आहेत.
व्हिडीओ पाहा