रियाज भाटी हे दाऊदशी संबंधित आहेत. तसंच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे मुंबईत दाऊद टोळ्यांचा वापर करत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
भाटी राष्ट्रवादीत होते, त्याबद्दल माफी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रियाज भाटी 4 महिने राष्ट्रवादीत होते हे मान्य केलं. तसंच भाटी हे राष्ट्रवादीत होते त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. मात्र तरीही नवाब मलिक यांनी रियाज भाटी यांचा दाऊदशी संबंध आहे, असा पुनरुच्चार केला आहे. रियाज भाटीला तुरुंगात टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सत्ताधारी भाजप आणि आशिष शेलार हे मुंबईत दाऊद टोळ्यांचा वापर करत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
रियाज भाटींकडून पुरावे सादर
मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्त्वात आला, तेव्हा तत्कालीन मुंबई अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांनी मला पद दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तर - पश्चिम विभागाचा सचिव होतो, असं रियाज भाटी यांनी म्हटलं आहे.
'मलिक माफी मागा'
दरम्यान, भाटी यांनी राष्ट्रवादीत असल्याचे पुरावे सादर केल्यानंतर, नवाब मलिकांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा कोर्टात जाऊन मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा भाटींनी दिला आहे.
नवाब मलिक यांचे आरोप
मुंबईतील रियाज भाटी नामक व्यक्तीचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत. त्याच रियाज भाटींनी भाजप आमदार आशिष शेलार यांना निवडणुकीत मदतही केली. त्याबदल्यात शेलार यांनी भाटी यांना मुंबई क्रिकेट असोशिएनमध्ये सामील करुन घेतलं, असा आरोप नवाब मलिक यांचा आहे.
त्यामुळे भाटी यांनी सादर केलेल्या पुराव्यानंतर नवाब मलिक काय उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं आहे.
संबंधित बातम्या
मी राष्ट्रवादीत होतो, रियाज भाटींचा गौप्यस्फोट
ना भाजपशी संबंध, ना दाऊदशी, रियाज भाटींचं स्पष्टीकरण
रियाज भाटी कोण हे पवारांनाच विचारा, भाजपचा राष्ट्रवादीवर पलटवार
स्पेशल रिपोर्ट : रियाज भाटी, भाजप आणि दाऊद