सोलापूर :  मी डिमांडर नाही तर कमांडर आहे. त्यामुळे मंत्रिपदाऐवजी आता स्वत:चं ताकद वाढवल्याचं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केले. ते सोलापूरमध्ये बोलत होते.


 

भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे गावागावात पक्षसंघटना वाढवून आमची ताकद वाढवून देऊ, असं जानकर म्हणाले. त्यामुळे घटकपक्षांची शिवसेना-भाजपवरील नाराजी अद्यापही दूर झाली नसल्याचंच चित्र आहे.

 

जानकर म्हणाले की, "विधानसभेमध्ये विचार मोजले जात नाहीत, डोकी मोजली जातात. रासपचा एक आमदार आहे. 122 आमदार भाजपचे आहेत आणि शिवसेनेचे 62 आमदार आहेत. त्यामुळे कोणावर टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आपला राजकीय पक्ष कसा वाढवला पाहिजे, त्यादृष्टीने कामाला लागलो आहे. महाराष्ट्रात ज्यावेळ पक्षाची खासदारकी आणि आमदारकीची ताकद वाढेल, त्यावेळी आम्हाला सगळेच विचारतील. आय एम नॉट अ डिमांडर, आम एम कमांडर."

 

पाहा व्हिडीओ