Hyderabad Liberation Day : आज हैदराबाद मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले.  त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या. 


मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन. हा लढा सोपा नव्हता मात्र रझाकारीच्या जोखडातून स्वतःची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानले.त्यांच्या बलिदानातून स्वतंत्र झालेल्या मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू असे आश्वासन देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या. केंद्र सरकारकडून स्वच्छता भारतसाठी 12000 कोटी मिळाले मिळाले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.


मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळ कमी झाला पाहिजे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवले पाहिजे, विकास कामाचा आम्ही वॉर रूम मधून आढावा घेत आहोत. जो काही बॅकलॉक आहे तो भरून काढण्याचं काम महाराष्ट्र सरकार करेल. मराठवाडा वाटर ग्रीडसह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक समाजातील घटकांचं सरकार आहे, असं ते म्हणाले.  


अंबादास दानवे यांच्या आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले की, Midc साठी जे भूखंड दिली आहे त्याला कोणतेही स्थगिती दिली नाही. त्याची माहिती घेण्याच्या फक्त सूचना दिल्या आहेत. नवीन उद्योगांना जास्तीत जास्त सवलती देण्यासाठी हा प्रयत्न आहे. मागील दोन-अडीच वर्षात काय झालं यावर मी बोलणार नाही. पण यापुढे उद्योग येतील त्यांना पूर्ण सहकार्य मिळेल, असंही ते म्हणाले.


मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणा


औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी 136 कोटी
पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार
जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार
मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प 
जालना पाणीपुरवठा नूतनीकरण
नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार
लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद
मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता
 


शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने


दरवर्षी औरंगाबादमध्ये शहीद स्तंभाला अभिवादन आणि ध्वजारोहण करुन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. मात्र यंदा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी औरंगाबादमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि शिंदे गट या निमित्ताने आमनेसामने येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री तात्काळ हैदराबादकडे रवाना होतील. हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी शिंदे जाणार आहेत. मात्र शिंदेंच्या याच छोटेखानी दौऱ्यावर शिवसेनेनं आक्षेप घेत टीका केली आहे. तर शिवसेनेकडूनही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ध्वजारोहण करण्यात येणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Operation Polo राबवलं आणि सरदार पटेलांनी माजलेल्या रझाकारांना गुडघ्यावर आणलं, असा आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास


Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्तिसंग्रामात 'तांदुळजा गढी'चे महत्त्व, याच गढीवर उद्या होणार ध्वजारोहण