गर्भपाताला नकार, नाशिकमध्ये महिलेला जाळण्याचा प्रयत्न
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 25 Mar 2018 03:06 PM (IST)
गर्भपात करण्यास नकार दिल्याच्या रागातून पती आणि त्याच्या भावाने महिला मारहाण करत, पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
नाशिक : गर्भपात करण्यास नकार दिल्याने पतीने भावाच्या साथीने पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. नाशिकमधील सटाणा तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली. नेमकं काय घडलं? गर्भपात करण्यास नकार दिल्याच्या रागातून पती आणि त्याच्या भावाने महिलेला मारहाण करत, पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. काल मध्यरात्री सटाणा तालुक्यात ही घटना घडली. रुपाली कुमावत असे गर्भवती महिलेचे नाव असून, ती या घटनेत 55 टक्के भाजली आहे. तिच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सटाणा पोलिस ठाण्यात रुपालीचा पती विलास कुमावत याच्यासह दीर आणि सासऱ्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.