मुंबई : पतीने पत्नी आणि दोन लहान मुलांवर विषप्रयोग केल्याची खळबळजनक घटना बदलापुरात घडली आहे. यात पत्नी आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. संभाजी भोसले असं या पतीचं नाव असून तो पत्नी आणि दोन मुलांसह बदलापूरच्या शिरगाव भागात राहत होता.
मात्र त्याच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्यानं तो विवंचनेत होता. त्यातूनच 15 मार्च रोजी त्याने पत्नी लक्ष्मी आणि दोन मुलांना शितपेयातून उंदीर मारण्याचं औषध दिलं. यानंतर आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी केएम रुग्णालयात पत्नी लक्ष्मी आणि सात वर्षांचा मोठा मुलगा निर्भय यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तर सहा वर्षांचा लहान मुलगा रुद्र हा अजूनही अत्यवस्थ आहे. याप्रकरणी मयत लक्ष्मी यांचे वडील चंद्रकांत आंबेकर यांनी संभाजी भोसले याच्याविरोधात बदलापूर पूर्व पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भादावी कलम 302, 307, 328 अन्वये संभाजी भोसले याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पतीचा पत्नी आणि दोन मुलांवर विषप्रयोग, पत्नीसह मोठ्या मुलाचा मृत्यू, तर लहान मुलगा अत्यवस्थ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2019 08:08 PM (IST)
पतीने पत्नी आणि दोन लहान मुलांवर विषप्रयोग केल्याची खळबळजनक घटना बदलापुरात घडली आहे. यात पत्नी आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. संभाजी भोसले असं या पतीचं नाव असून तो पत्नी आणि दोन मुलांसह बदलापूरच्या शिरगाव भागात राहत होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -