भाजपसोबतच्या युतीमध्ये शिवसेना राज्यातील 48 पैकी 23 जागा लढवणार आहे. यापैकी 21 उमेदवार शिवसेनेने जाहीर केले आहेत. 19 विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून उस्मानाबादेतील विद्यमान खासदाराचं तिकीट कापण्यात आलं आहे, तर हिंगोलीत यंदा नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.
उस्मानाबादमध्ये विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांऐवजी ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. हिंगोलीत हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. पालघर आणि सातारा या जागांचे उमेदवार रविवारी जाहीर होतील. पालघरमधून श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.
शिवसेना उमेदवारांची कोणासोबत लढत होणार?
ठाणे - राजन विचारे (शिवसेना) VS आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना) VS बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
रायगड - अनंत गीते (शिवसेना) VS सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना) VS पार्थ पवार (राष्ट्रवादी)
शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) VS अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना) VS धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
नाशिक - हेमंत गोडसे (शिवसेना) VS समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना) VS राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
परभणी - संजय जाधव (शिवसेना) VS राजेश विटेकर (राष्ट्रवादी)
अमरावती - आनंदराव अडसूळ (शिवसेना) VS नवनीत कौर राणा (राष्ट्रवादीचा पाठिंबा)
VIDEO | शिवसेनेची लोकसभेसाठीची पहिली यादी जाहीर
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर
मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिवसेना) VS एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
मुंबई दक्षिण- अरविंद सावंत (शिवसेना) VS मिलिंद देवरा (काँग्रेस)
यवतमाळ - भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना) VS भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
हातकणंगले - धर्यशील माने (शिवसेना) VS राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
राज्यातील इतर महत्त्वाच्या लढती
अहमदनगर - सुजय विखे पाटील (भाजप) VS संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
गडकरी वि. पटोले, पूनम महाजन वि. प्रिया दत्त, महाराष्ट्रातील बिग फाईट्स
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन (भाजप) VS प्रिया दत्त (काँग्रेस)
नागपूर - नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस)
धुळे - सुभाष भामरे (भाजप) VS कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)
नंदुरबार- हीना गावित (भाजप) VS के. सी. पडवी (काँग्रेस)
बीड- डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) VS बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी)
वर्धा - रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस)
गडचिरोली-चिमुर - अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस)