पुणे : रसिलाच्या हत्येमागे एकट्या सुरक्षारक्षकाचा हात असू शकत नाही. वरिष्ठ कर्मचाऱ्यांचाही रसिलाच्या खुनात हात असू शकतो, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.


मूळची केरळची असणारी 23 वर्षीय रसिला राजू ओपीची हिंजवडीमधील इन्फोसिसच्या आवारातच रविवारी गळा आवळून हत्या झाली होती. ‘एक टक का बघतोस,’असा जाब विचारल्याच्या रागातून रसिलाची हत्या झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

'एक टक का बघतोस,' जाब विचारल्याने इन्फोसिसच्या इंजिनिअरची हत्या


परंतु रसिलाच्या हत्येमागे केवळ सुरक्षरक्षक असू शकत नाही. सुरक्षारक्षक ऑफिसमध्ये कसा काय पोहोचला? तिच्या खुनात वरिष्ठांचा हात असू शकतो. तिने वारंवार त्यांच्याकडे ट्रान्सफरची मागणी केली होती, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील नेमकं सत्य बाहेर आणण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, रसिला ओपीच्या हत्येप्रकरणी सुरक्षारक्षक भाबेन सैल्कियाला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. भाबेन मूळचा आसामचा आहे.

हिंजवडीत महिला आयटी इंजिनिअरची हत्या, सुरक्षारक्षक ताब्यात