औरंगाबाद | गुप्तधनासाठी मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. फुलंब्री तालुक्यातील रांजणगावमध्ये एका चिमुकलीचा बळी दिला जाणार होता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी वेळीच छापा टाकल्याने मुलीचा जीव बचावला आहे.
अंधश्रद्धेतून मुलीचा बळी देण्यासाठी रांजणगावात सर्व तयारी करण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि वडोदबाजार पोलिसांनी अचानक छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे. इमाम पठाण आणि बाळू शिंदे अशी यातील दोन आरोपींची नावं आहेत.
ही पूजा करण्यासाठी एकाला 1 लाख 68 हजार रुपये देण्यात येणार होते, अशी माहितीही समोर आली आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी नग्न पूजा आणि बालिकेचा बळी दिला जाणार होता. मात्र, अंनिस आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळं पुढील अनर्थ टळला आहे.
गुप्तधनासाठी चिमुकलीचा बळी देण्याचा प्रयत्न, तिघे अटकेत
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
24 Aug 2018 05:19 PM (IST)
गुप्तधनासाठी मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. मात्र अंनिस कार्यकर्ते आणि पोलिसांनी वेळीच छापा टाकल्याने मुलीचा जीव बचावला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -