सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात आंबा-काजू बागांमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवरील ‘कोल्ह्य़ाचो पाचो’ परिसरात दुपारी लागलेल्या भीषण आगीत जवळपास 1 हजार कलमे जळून खाक झाली आहेत.


सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावात लागलेल्या आगीत सुमारे 40 एकर क्षेत्रावरील जवळपास 1 हजार काजू कलमे जळून खाक झाली. स्थानिक आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आलं आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे दहा लाखाहून जास्त नुकसान झाले.

दरम्यान आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेलं नाही. ऐन काजूच्या हंगामात हाता-तोंडाशी आलेले काजूचे पीक अचानक आगीने गिळंकृत केल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.