HSC Result Date : महाराष्ट्र बोर्डातर्फे (Maharashtra Board) बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आपल्या निकालाची (HSC Result 2022) वाट पाहत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये विविध दावे केले जात आहेत. काही अहवालांमध्ये जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, तर काहींमध्ये 10 जूनपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचा दावा केला जातोय. पण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी अधिकृतपणे बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याची माहिती दिली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 12 वीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती दिली.
बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील
- www.maharesult.nic.in
- www.maharesult.nic.in
- msbshse.co.in
- hscresult.11thadmission.org.in
- hscresult.mkcl.org
- mahresult.nic.in
कसा पाहाल बारावीचा निकाल, जाणून घ्या सोप्या स्टेप्स
- सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जा.
- येथे होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा
- एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल
- महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा
- लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा
- सबमिट करा.
- बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल
- आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा
दरम्यान, बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या. 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली होती. राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. एबीपी माझावर तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकता.