Maharashtra HSC Class 12 Results नागपूर : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे.  महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा (Maharashtra board result 2024) वेबसाईटवर हा निकाल आज मंगळवार, 21 मे 2024 च्या दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. विदर्भात एकूण 1 लाख 63 हजार 017 विद्यार्थ्यांनी बारवीची परीक्षा दिली होती. त्यामुळे या निकालाकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबियांचे देखील लक्ष लागले आहे. आज अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली.


नागपूरसह विदर्भ विभागाचा निकाल काय?


या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल जाहीर केला. महाराष्ट्राचा 12 वीचा निकाल हा 93.37 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला असून यात यंदाही मुलींने बाजी मारली आहे, तर कोकण विभाग सर्वात अव्वल ठरला आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. 


राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकणने विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.91 % तब्बल टक्के लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल 91.95 % लागला आहे. यात पुणे विभागाचा निकाल 94.44 टक्के निकाल लागला आहे. राज्यात नऊ विभागात तिसऱ्या क्रमांकावर पुणे विभागाचा निकाल लागला आहे. तर नागपूरात 92.12 टक्के, संभाजी नगर 94.08 टक्के, कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36 निकाल लागला आहे.


154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल शंभर टक्के


यात एकूण 154 विषयासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यात एकूण 14 लाख 23 हजार 970 परीक्षार्थी  होते तर त्यातील 13 लाख 29 हजार 684 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सोबतच 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान विभाग निकाल हा 97.82 टक्के, कला शाखा निकाल 85.88 टक्के, वाणिज्य विभाग निकाल 92.18 टक्के, तर व्यवसाय अभ्यासक्रम 87.25 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल 2.12 ने जास्त लागला आहे.


विभागनिहाय निकाल



जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या



       एकूण : १,६३,०१७


कसा पाहाल निकाल? 



  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

  • निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.

  • संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचं होमपेज ओपन होईल. तेथे महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.

  • या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला

  • रोल नंबर किंवा शाळेचा कोड विचारला जाऊ शकतो. विचारण्यात आलेली माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.


इतर महत्वाच्या बातम्या 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI