नवी मुंबई: माध्यमिक शालांत परीक्षा (SSC Exam) सुरू होण्याच्या एक दिवस आधी अचानक इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र बदलण्यात आलं आहे. मात्र परीक्षा केंद्रात बदल कशासाठी करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती प्रशासनाने दिली नाही. नवी मुंबईतील वाशी मोनामी परीक्षा केंद्र बदललं असून उर्दू शाळेतील केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असं सांगण्यात आलं आहे. परीक्षा सुरू होण्याच्या आधी एक दिवस हा निर्णय घेतल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
केंद्राच्या माध्यमातून दिली जात नसल्याने पालक आणि परीक्षार्थी विद्यार्थी वर्गाची तारांबळ उडाली आहे. सुमारे २८४ मुलांच्या केंद्रात अचानक बदल करण्यात आला आहे.
उद्यापासून दहावीच्या शालांत परीक्षा सुरू होत आहेत. मात्र एक दिवस आधीच गोंधळ झाल्याचं दिसून येतंय. नवी मुंबईतील वाशी येथील मोनामी शालेय केंद्रावर 284 विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परीक्षा केंद्रामध्ये बदल करून वाशी येथील उर्दू शाळेतील केंद्रावर मुलांना परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र ज्या ठिकाणी हे केंद्र हलवण्यात आले आहे, त्या उर्दू शाळेत आसनव्यवस्थेबाबत माहिती लावण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या संभ्रमात आणखीन वाढ झाल्याचं दिसून येतंय.
दहावीच्या परीक्षाबाबत निर्णय माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ प्रशासन घेत असल्याने या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तसा काही संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान परीक्षेच्या आदल्या दिवशी केंद्रात बदल केल्याने विद्यार्थी आणि पालक मात्र चांगलेच हवालदिल झाले आहेत. साध्या फलकावर माहिती लिहून केंद्र बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पालकांना केंद्रात बैठक व्यवस्था बघण्यासाठी आल्यावर हा प्रकार समजला. माध्यमिक शालांत परीक्षेचा अत्यंत महत्वपूर्ण परीक्षेच्या व्यवस्थापनेत अचानक झालेल्या या बदलामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
दहावीची परीक्षा उद्यापासून सुरू होत असून मराठी माध्यमाचा उद्या पहिला पेपर आहे. 3 मार्च रोजी इंग्रजी माध्यमाचा पहिला पेपर आहे. परीक्षा मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आसन व्यवस्था परीक्षेच्या आदल्या दिवशी उपलब्ध असल्याचे कळवण्यात आले. त्यानंतर परीक्षा केंद्रावर आसन व्यवस्था पाहण्यासाठी गेलेल्या पालकांना परीक्षा केंद्रच बदलण्यात आल्याचं निदर्शनास आले. मात्र याबाबत शाळा व्यवस्थापनाकडून माहिती देण्याचे टाळले जात आहे.
ही बातमी वाचा: