मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकासाठी निधीची तरतूद कशी करणार, असा खडा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे.


इतकंच नाही तर याबाबत 3 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देशही कोर्टाने सरकारला दिले.

मोहन भिडे यांनी शिवस्मारकाच्या उभारणीला विरोध करणारी जनहित याचिका दाखल केली आहे.

शिवरायांचा पुतळा बनवायला मिळणं भाग्य समजतो : राम सुतार


राज्याची आर्थिक स्थिती मजबूत नसताना शिव स्मारक उभारण्याचा अट्टहास का?, असा सवाल करत भिडे यांनी शिवस्मारकाला विरोध केला आहे.

VIDEO : असं असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक!


शिवस्माराकासाठी अंदाजे 3600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.

कसं असेल शिवस्मारक?

16 एकर जमीन


शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल. समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखविण्यासाठी दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे.

स्मारकाची जागा राजभवनपासून दक्षिण-पश्चिम बाजूस 1.2 कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने 3.60 कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस 2.60 कि.मी अंतरावर आहे.

स्मारकासाठी 15.96 हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 650 मी 325 मी. एवढे आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे.

स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील 2500 कोटी रुपयांपैकी 1200 कोटी रुपये हे शिवाजी महाराजांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्यासाठी असतील. मात्र प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्लॅन अजून निश्चित झालेला नाही. या टप्प्यात हेलिपॅड आणि आयमॅक्स थिएटर यांसारख्या सुविधा असाव्यात, असा प्रस्ताव आहे.

या वर्षअखेरिस प्रकल्पाचं काम सुरु होणार असून काम पूर्ण होण्यासाठी 36 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत.

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न

शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला अरबी समुद्रात फक्त हे सहा जण उतरणार!

शिवस्मारक: जल-माती कलशाची भव्य शोभायात्रा

शिवमय नव्हे भाजपमय, शिवस्मारकाच्या कलशयात्रेवर मेटे नाराज

‘शिवस्मारक व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा’ शिवसेनेची पोस्टरबाजी

मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमिपूजन