नवी दिल्ली: शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरची विमान प्रवासबंदी हटण्याची कुठलीच शक्यता नाही. आज रवींद्र गायकवाडांनी लोकसभेत याप्रकरणी निवेदन केलं.


रवींद्र गायकवाड यांच्या निवेदनानंतर शिवसेनेचे मंत्री अनंत गीतेंनी गायकवाडांवरची विमानप्रवास बंदी मागे घेण्याची विनंती केली. पण, हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी मात्र प्रवाशांच्या सुरक्षेची तडजोड करणार नसल्याचं सांगत बंदी मागे घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

हवाई वाहतूक मंत्री गजपती राजूंचं नेमकं काय म्हणाले:

हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी या निवदेनावर उत्तर  दिलं. ‘खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणात कायदा आपलं काम करेल. सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असं अशोक गजपती राजू म्हणाले.

गजपती राजूंनी नकार दिल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांनी बराच वेळ सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं.

संबंधित बातम्या:

मी मारलं नाही, त्या अधिकाऱ्याला फक्त ढकललं: रवींद्र गायकवाड


 

सरकारच्या एकतर्फी निर्णयाची लाज वाटते : खा. अनंत गीते