Voter ID Card Address Update : सध्या आपल्याला प्रत्येक ठिकाणी पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र अथवा आधार कार्ड दाखवत असतो. पण यावरील माहिती अपडेट नसेल तर आपली मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे आपल्या कागदपत्रावरील सर्व माहिती अद्यावत असणे गरजेचं आहे. त्यामुळे कुठेही गेल्यानंतर आपली अडवणूक होणार आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला मतदार ओळखपत्रामध्ये पत्ता कसा अपडेट करावा याची माहिती देणार आहोत. अगदी काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही घरबसल्या पत्ता अपडेट करु शकता.
घरबसल्या वोटर आयडी कसं अपडेट करावं हे जाणून घ्या.
- तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल वापरून ऑनलाईन विनंती अर्ज करावा लागेल.
- सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट https://www.nvsp.in/ वर जावे लागेल . तुमच्याकडे खाते नसल्यास, लॉगिन स्क्रीनच्या खाली "Register" या बटणावर क्लिक करा.
- लॉगिन केल्यानंतर, तुमच्या मतदार ओळखपत्रावरील पत्ता बदलण्यासाठी (Migration to another place) पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रात बदल करायचे आहेत की कुटुंबासाठी हे निवडायचे आहे.
- तुमच्या मतदार ओळखपत्रातील पत्ता बदलण्यासाठी 'सेल्फ' (self) पर्याय निवडा, किंवा कुटुंब (Family)निवडा.
- आता तुम्ही तुमच्या मतदारसंघातच जाणार आहात की बाहेर ते निवडा
- आता तुमच्या समोर फॉर्म 6 उघडेल. येथे तुम्हाला तुमचे सध्याचे ठिकाण, पत्ता, मतदारसंघ आणि इतर तपशील भरावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पोस्टल पत्ता, कायम पत्ता इत्यादी तपशील भरावे लागेल.
- सर्व काही भरल्यानंतर, तुमचा पत्ता आणि वयाच्या दाखल्यासह तुमचा फोटो अपलोड करा.
- फॉर्म 6 च्या शेवटी स्वयंघोषणा भरा, कॅप्चा प्रविष्ट करा आणि विनंती सबमिट करा.
- विनंती सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळेल आणि बदल केल्यानंतर, तुमच्या सध्याच्या पत्त्यावर एक नवीन मतदार आयडी दिला जाईल.
महत्वाच्या बातम्या :
- Video : पालिकेच्या विशेष सभेत सिगारेटचे झुरके; काँग्रेसच्या नगरसेवकाचा प्रताप
- नाना पटोले यांनी मानसिक उपचार करून घ्यावेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
- Pegasus : पेगासस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल ; भारत-इस्रायल संरक्षण कराराच्या चौकशीची मागणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha