मुंबई : जगात पुन्हा एकदा जुन्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटमुळे चिंतेत वाढ झाली आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे देशासह राज्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा (corona) धोका अद्याप टळलेला नसताना आता नव्या रूपात कोरोना पाय रोवू लागला आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांची स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ताप, सर्दी व खोकला, थकवा जाणवणं, मळमळ व उलट्या होणं आणि वारंवार चक्कर येणं अशा समस्या जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Continues below advertisement

ओमायक्रॉन प्रकार आता चिंतेचा विषय बनला आहे. या नवीन शोधलेल्या प्रकाराला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ‘चिंतेचा प्रकार’ म्हटले आहे. हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला आणि त्यानंतर पाहता-पाहता तो संपूर्ण जगभरात पोहोचला. भारतातही ओमायक्रॉनचे 21 रूग्ण सापडले आहेत तर महाराष्ट्रात 8 रूग्णांची नोद झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सुरक्षित राहण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आधीच्या कोणत्याही व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याची नोंद करण्यात आली आहे. ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आल्यानंतर आता अनेक देशात याचा प्रसार होऊ लागला आहे. त्यामुळे ओमायक्रॉन आजार नेमका काय आहे? याची लक्षणं कोणती? याबाबत पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे. कारण आजाराचे वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो. 

Continues below advertisement

लक्षणे ज्यांना या स्ट्रेनची लागण झाली आहे, त्यांच्यामध्ये लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. एखाद्याला थकवा जाणवेल पण ऑक्सीजन पातळीत घट होणार नाही. घसा खवखवणे, अंगदुखी, कोरडा खोकला, सौम्य स्नायू दुखी ही त्याची इतर लक्षणे आहेत. एखाद्याला गंध कमी होणे आणि चव कमी होणे यासारखी लक्षणे नसू शकतात जी सामान्यतः पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान दिसून आली होती.

सध्याची लस ओमायक्रॉनवर किती प्रभावी ठरेल?

सध्या उपलब्ध असलेली लस नव्याने आढळलेल्या ओमायक्रॉन कोविड प्रकाराविरूद्ध प्रभावी आहेत. त्यामुळे आपण पूर्णपणे लसीकरण केले आहे, याची खात्री करा. तुम्ही पूर्णपणे लसीकरण केले असेल, तर तुम्हाला हा आजार झाला असला तरीही गंभीर आजार होण्यापासून वाचता होईल.

ओमायक्रॉनपासून सुरक्षित राहण्यासाठी 'हे' करा! 

पूर्णपणे लसीकरण करणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे, हातांची स्वच्छता राखणे, आजारी व्यक्तींच्या संपर्कात न राहणे, खोकताना अथवा शिंकताना तोंडासमोर रुमाल धरणे, आवश्यक नसताना प्रवास टाळणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि प्रवासापूर्वी आणि नंतर चाचणी करणे अतिशय गरजेचं आहे. कारण, एखाद्याला आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रवास करणे आवश्यक असल्यास या नियमांच पालन केल्यास या आजाराची लागण होण्यापासून स्वतःला  वाचवता येईल.

संबंधित बातम्या 

Omicron : काय म्हणता! 1963 मध्येच आला होता 'ओमायक्रॉन'? पोस्टर होतंय व्हायरल

Video : Omicron Variant : ओमायक्रॉन खरंच एवढा धोकादायक आहे का? सध्यातरी व्हेरियंटवर एकच पर्याय!