राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ‘जीवनदायी’ ठरत आहे... तर आज आपण रुग्णालयीन खर्चासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळायचा याची माहिती जाणून आहोत.. भरमसाठ वैद्यकीय खर्च न झेपणाऱ्या कुटुंबांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे मदत मागावी लागते. त्यासाठी काही गोष्टींची प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर मंत्रालयात जावे लागायचे. पण आता राज्यातील जनतेसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू झाले आहे... त्यामुळे आता सहायता निधीसाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही..
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कागदपत्रे कोणती?
1. अर्ज (विहीत नमुन्यात)2. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)3. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रू. 1.60 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)4. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक5. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)6. संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.7. अपघातग्रस्त रुग्णांसाठी MLC रिपोर्ट आवश्यक आहे.9. प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.10. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
सहायता निधीसाठी अर्ज नेमका कसा करायचा?
01. मुख्यमंत्री सहायता निधी फॉर्म खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करावे.https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/medical%20form.pdf
02.आपले रुग्णालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये आहे का? हे चेक करा.
https://docs.google.com/spreadsheets/d/1QUODMYZ8oY1lPyY2vl1dsX4w6MzBfaGB/edit?gid=1178235983#gid=1178235983
03. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्जामधे नमूद केलेल्या आजारबद्दलची यादी बघून आपला आजार निश्चित करावा.
04. अर्जासोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला (1 लाख 60 हजार पर्यंत, चालू वर्षाचा ) असणे बंधनकारक आहे..
05. सहायता निधी संपूर्ण फॉर्म भरून फोटो लावणे.
06.उपचार घेत असलेल्या रुग्णालयाचे कोटेशन व कोटेशनवर रुग्णालय व सिव्हिल सर्जन यांचा सही व शिक्का असणे गरजेचं आहे.
07. अपघात झाला असल्यास FIR रिपोर्ट किंवा पोलिस डायरीची प्रत जोडावी ( MLC रिपोर्ट ग्राह्य धरण्यात येणार नाही )
08. अर्जामध्ये नमूद केलेल्या आजाराबद्दलची सर्व कागदपत्रे (एक्सरे, CT स्कॅन, MRI रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट्स, इत्यादी) संपूर्ण रिपोर्ट जोडावे. अवयव प्रत्यारोपण असल्यास मॅचिंग रिपोर्ट लावावे..
09.अर्ज संपूर्ण भरल्यानंतर aao.cmrf-mh@gov.in यावर ईमेल करावा.. तसेच आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये देखील जमा करावा.
10. अर्ज स्वीकार झाल्यानंतर आपण आपल्या अर्जाची स्थिती https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action या लिंक वर बघू शकता किव्हा अधिक संपर्काकरिता 9321103103 ह्या क्रमाकांवर चौकशी करू शकता.
यावर तुम्हाला मुख्यमंत्री कक्षाकडून वैद्यकीय मदत देण्यात येईल..