NEET Exam 2025 : नीट परीक्षेच्या इतिहासात कधी नव्हे तो फिजिक्सचा पेपर अतिशय अवघड आला होता. अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय नसताना सुद्धा प्रश्नपत्रिकेच्या मांडणीमुळे विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला. विस्तृत स्वरुपातले प्रश्न वाचणे आणि त्यावर विचार करून उत्तर लिहिणे यामुळे विद्यार्थ्यांना वेळ पुरला नाही. शिवाय आधीच निगेटिव मार्किंग आणि त्यात संभ्रमात टाकणारे प्रश्न विद्यार्थ्यांना ही परीक्षा अतिशय अवघड गेल्याची प्रतिक्रिया नीटची परीक्षा (NEET Exam 2025) देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली आहे. परिणामी रॉकिंग घसरण्याची शक्यताही आता विद्यार्थ्यांनी वर्तवली आहे.
नीट परीक्षेतील फिजिक्सच्या पेपरमध्ये 45 प्रश्न असतात. तर केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये 45 प्रश्न असतात आणि बायोलॉजीला 90 प्रश्न पडतात. सोबतच हा पेपर सोडवतांना तीन तासाचा वेळ असतो. अशी एकूण 720 मार्काचा नीटची परीक्षा असते. सरासरी प्रत्येक प्रश्नाला 45 सेकंड तर सव्वा मिनिट वेळ विद्यार्थ्यांना मिळतो. मात्र फिजिक्सच्या पेपरमध्ये विस्तृत प्रश्न आलेत. जे प्रश्न नवीन फॉरमॅटमध्ये होते. ती वाचून घेऊन समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ लागला आणि त्याची उत्तरे लिहिताना त्यांना अडचणींना सामोरे जावं लागलं. सोबतच काही प्रश्न समजून घेऊन उत्तर लिहिण्यासाठी तीन ते पाच मिनिट लागू शकत होते. त्यामुळे वेळेची कसरत विद्यार्थ्यांसमोर होती. यात मुख्य समस्या होती ती निगेटिव्ह मार्किंगची. उत्तर चुकलं तर मार्क जाणार या भीतीने विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवायलाच हिम्मत केली नाही.
नीट परीक्षेचा पेपर लीक प्रकरण, देशातील 250 विद्यार्थ्यांवर कारवाई
गेल्या वर्षी म्हणजे 2024 झाली वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेली नीटच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याची घटना समोर आली होती. देशातील अनेक भागात नीटचा पेपर लीक झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर याप्रकरणी गंभीर दखल घेत राष्ट्रीय वैद्यक परिषदेने व नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही याप्रकरणी चौकशी सुरू केली होती. आता या प्रकरणी देशातील जवळपास 250 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रथम वर्ष एमबीबीएससाठी प्रवेश घेतलेल्या 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहे. तर 62 विद्यार्थ्यांना 3 वर्षासाठी नीट परीक्षेतून निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 2024च्या नीट परीक्षेत देशातील 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 मार्क मिळवले होते. यावरून पेपर लीक झाल्याच्या संशयाला पुष्टी मिळते. या सर्व प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेत नुकतीच ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे 2025ची नीट परीक्षा काल (दिनांक 4 मे रोजी) पार पडली. यावर्षीच्या नीट परीक्षेच्या एक दिवस आधी ही कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI