Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलत आहे. दरम्यान, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत सरकार मोठा निर्णय घेम्याच्या तयारीत असल्याचं बोलं जात आहे. यासंदर्भात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. नौदल आणि हवाई दल प्रमुखांच्या बैठकीनंतर संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबतची ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. सिंधू पाणी करार स्थगित केला. यासोबतच पाकिस्तानमधून आयात करण्यावरही बंदी घालण्यात आली. सीसीएस बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला स्वतःच्या सोयीनुसार वेळ आणि लक्ष्य ठरवून प्रत्युत्तर देण्याची स्वातंत्र्य दिले होते. सरकारच्या या निर्णयानंतर पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे, ज्याला भारतीय सैन्य योग्य उत्तर देत आहे.
22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील देखील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.तसेच या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी देखील झाले होते. या दङसतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. तपास यंत्रणांनी तापासाला सुरुवात देखील केली आहे.दहशतवादी हल्ल्याच्या तपासात नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. तपास यंत्रणा असलेल्या एनआयएच्या (NIA) हाती या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे लागले असून, दहशतवाद्यांनी वापरलेली हत्यारे बेताब खोऱ्यात लपवून ठेवली होती, हे तपासात स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यामागे लश्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानचा एकत्रित कट होता. ही कारवाई पूर्वनियोजित होती आणि तिची आखणी पाकिस्तानमधून करण्यात आली होती, असेही तपासात समोर आले आहे. तर पाकिस्तानच्या पाठबळावर चालणाऱ्या संघटनांचा संपर्क 'हमास'शी असल्याची माहिती मिळाली आहे. हमासने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसोबत आयोजित केलेल्या एका रॅलीत सहभाग घेतला होता.
महत्वाच्या बातम्या: