पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाचे चाहते मनसेसह विरोधी पक्षात देखील आहेत. राजकीय नेत्यांमध्ये त्यांचं वक्तृत्व खूप चांगलं मानलं जातं. राज ठाकरे यांचं हे वक्तृत्व नेमकं कसं बहरलं? याबाबत राज ठाकरेंनी स्वत: माहिती दिली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. 


यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की,  वक्तृत्व स्पर्धेतून वक्ते घडत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्यावर बोलण्यासाठी वेळ पुरणार नाही.  मी अनेक वक्ते पाहिले आणि ऐकले आहेत,त्यातून मी बोलेल अस कधी वाटलं नव्हतं. भारत पाकिस्तान सामना होता ती होऊ देणार नाही असं सांगितल्यानंतर तो सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर आम्ही एक जल्लोष कार्यक्रम घेतला. त्यात बाळासाहेब यांनी मला सागितले तू बोल. आणि मग मी माझ्या आयुष्यातील पहिलं भाषण शिवतीर्थवर केलं. तोपर्यंत मी बोलेल यावर विश्वासच नव्हता, असं राज ठाकरे म्हणाले.


Raj Thackeray : 'लॉकडाऊन आवडे सरकारला... सर्व गोष्टी सुरु, मग सणांवरच का येता?' राज ठाकरेंचा सरकारला सवाल 


राज ठाकरे म्हणाले की,  आता जे बोलत आहेत त्याचा सगळ्याचा हेवा वाटतो. सहभागी झाले त्यांचं आभार मानतो. 


यावेळी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, सध्या कोविडमुळे सरकारकचा मूर्खपणा सुरू आहे. सरकार हवं ते करतंय मात्र बाकीच्यांनी काही करायचं नाही, असं सुरु असल्याचं ठाकरे म्हणाले. 



शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. आज या स्पर्धेची अंतिम फेरी आहे. अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धेकांची भाषणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यासाठी राज ठाकरे कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते.  


उत्सवांवरुन सरकारवर टीका


नुकतंच राज ठाकरे यांनी उत्सव साजरे करण्यावरील निर्बंधांवरुन सरकारवर टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही. यांना जे हवंय तेवढं वापरायचं आणि बाकीचं बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायंच. त्यामुळे मी उत्सव साजरा करा असे सांगितले, असं राज ठाकरे म्हणाले होते. पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरती बिल्डरांच्या गाड्या येणं काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही तर या सणांवरच तुम्ही कसे काय येता? असा सवाल त्यांनी केला होता.