सातारा: महाबळेश्वर, पाचगणी फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना आता घोड्यावर बसून सैर करण्याचा आनंद घेता येणार नाही. कारण या ठिकाणच्या घोड्यांवर पोलिसांनी बंदी आणली आहे. यामुळे पर्यटकांना घोड्यांवर बसून सैर तर करता येणार नाही आणि फोटोही काढता येणार नाही. तर दुसरीकडे पिढीजात घोड्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांची दिवाळी आता अंधारमय होणार आहे.
पोलिस प्रशासनाने बंदी आणल्याने घोड्यांच्यी टाप थांबल्यामुळे पाचगणीच्या टेबल लँडवर आणि महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात हा सन्नाटा पहायला मिळत आहे. सेल्फी आणि डोळ्याला दिसेल तेवढेच पाहून या ठिकाणाहून पर्यटक परतीच्या मर्गावर जाताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी याच टेबल लँडवर घोडे सवारी कराताना पर्यटकाचा पडून मृत्यू झाला होता. यामुळे पोलिस प्रशानसाने घोड्यांवर बंदी आणली आहे.
पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घोडे व्यावसायिकांवर आलेल्या या बंदामुळे आता स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत. पोलिस प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. एखाद्या घटनेमुळे पोलिसांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे, असे महाबळेश्वरचे नगराध्यक्ष कुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाबळेश्वर, पाचगणीत घोड्यांवर बंदी, पर्यटकांची निराशा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2018 03:20 PM (IST)
पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घोडे व्यावसायिकांवर आलेल्या या बंदामुळे आता स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत. पोलिस प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -