हिंगोली: एका पुजाऱ्यानं स्वतःचं सरण रचून स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे. विठ्ठल पोले असं या पुजाऱ्याचं नाव आहे.

पोले हे गेली 4 वर्ष औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव जवळच्या हनुमान मंदिरात पुजारी म्हणून काम करत होते. ते तिथेच राहत होते.

आज सकाळी 6 वाजता मंदिरातून धूर निघत असल्याचं पाहून नागरिकांनी तिथे धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच 60 वर्षीय पोले जळून खाक झाले होते.

पोले यांनी हे पाऊल का उचललं याबाबत काहीही माहिती मिळत नाही. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.