Hingoli News : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात देवीच्या विसर्जन मिरवणुकीवरुन दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वेलतुरा गावात ही घटना घडली आहे. या मारहाणीत लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीत गावातील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 

 लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत तुफान हाणामारी

देवीच्या विसर्जन मिरवणुकीच्या कारणावरुन दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. गावात आज  देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. ही विसर्जन मिरवणूक गावातल्या मारुती मंदिराजवळ जवळ आल्यानंतर घोषणा देताना हा वाद झाला आहे. त्यामुळे वेलतुरा गावातील दोन गट यावेळी आमने-सामने आले. यावेळी लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत त्यांच्या मध्ये ही तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीमध्ये गावातील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. गावात आता तणाव पूर्ण शांतता आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवरात्र हा देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांना समर्पित असलेला एक हिंदू सण

 
नवरात्र हा देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांना समर्पित असलेला एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा केला जातो. या उत्सवात देवीच्या दैवी शक्तीची पूजा केली जाते, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. भक्त देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करतात, व्रत ठेवतात आणि रास-गरबा यांसारख्या पारंपरिक नृत्यांमध्ये सहभागी होतात. हा सण देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून धर्माची स्थापना केली, हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. प्राचीन काळी, हा उत्सव कृषी उत्सवाचा भाग होता, जेव्हा शेतकरी पेरलेले पहिले पीक घरी आल्यावर साजरा करत असत. नवरात्रीत देवतेच्या नऊ अवतारांचा समूह, नवदुर्गा, यांची पूजा केली जाते. दुर्गापूजा देवीच्या राक्षसांना मारणाऱ्या रूपाचे, ज्याला महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखले जाते, सन्मान करते. दसरा आणि विजया दशमीचे दिवस काहींसाठी रामाने रावणावर विजय मिळवला तर काहींसाठी दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवला होता. दरम्यान, अलिकडच्या काळात अशा या मोठ्या उत्सवांना ालबोट लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Kanya Pujan 2025: नवरात्रीत कन्यापूजन अष्टमी की नवमीला करायचं? घराची भरभराट होण्यासाठी पूजेची योग्य पद्धत, नियम, शुभ मुहूर्त जाणून घ्या..