Maharashtra Sugarcane Farmer :  राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदाचा उसाचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. आज राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकातील कारखान्यांबरोबर सीमेलगतच्या कारखान्यांना हंगाम सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकात जाऊ नये म्हणून राज्य सरकारनं घेतला हा निर्णय 

महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकात जाऊ नये म्हणून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या हंगामात एकूण 1 हजार 250 लाख टन ऊस उपलब्ध असेल असा अंदाज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री निधीसाठी दरवर्षी घेण्यात येणारे प्रतिटन 5 रुपयांवरुन 15 रुपये करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. 

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून जगभरात भारताची ओळख

देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे. त्यामुळं दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन होतं. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून जगभरात भारताची ओळख आहे. दरम्यान, यावर्षी 1 नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. या नवीन पीक हंगामात निर्यातीला परवानगी देण्यासाठी पुरेसा अतिरिक्त साखरेचा साठा ठेवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. भारतातील साखर निर्यातीमुळे जागतिक किमतींवर दबाव येऊ शकतो, परंतु यामुळे भारत सरकारला देशांतर्गत साखरेच्या किमतींना आधार मिळण्यास आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी किमान आधारभूत किंमत मिळण्यास मदत होईल.

Continues below advertisement

भारताचा साखरेचा साठा वाढणार

भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 2025-26 या मार्केटिंग वर्षात (1 ऑक्टोबरपासून) उत्पादन 34.9 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढू शकते. नवीन हंगामात देशातील साखरेचा वापर 28.5 ते 29 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जो या वर्षी 28 दशलक्ष मेट्रिक टन होता. भारत नवीन विपणन वर्षाची सुरुवात 5 दशलक्ष मेट्रिक टनांच्या सुरुवातीच्या साठ्याने करेल, जो या वर्षाच्या सुरुवातीला 8 दशलक्ष मेट्रिक टन होता. भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन घेतलं जातं. आपली देशाची गरज भागवून देश मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात परदेशात करतो. दरम्यान, मागली वर्षी काही राज्यांमध्ये ऊसाचं क्षेत्र घटलं होतं. त्यामुळं ऊसाचा गळीत हंगाम देखील कमी दिवसाचा झाला होता. परिणामी उत्पादन देखील काही प्रमाणात कमी झालं होतं. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी झाल्या आहेत. त्यामुळं यावर्षी साखेरच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयानं दिला महत्वपूर्ण निर्णय