Hingoli flood: हिंगोलीत पावसाने चांगलीच दणादाण उडवली असून स्कूलबस पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. नद्या नाले ओढे ओसंडून वाहत आहेत. रस्त्यावर प्रचंड पाणी साठल्याने रस्ते दिसेनासे झाले आहेत. जिल्ह्यात नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून बचाव पथक तसेच प्रशासन पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढणे अवघड होऊन बसलंय. नदी, नाल्यांना पूर आल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. या भागात परिस्थिती गंभीर असून नुकसान पाहणीसाठी प्रशासनाकडून आढावा घेतला जातोय.


परभणीच्या जिंतूरमध्येही पावसाचा धुमाकूळ 


परभणीच्या जिंतूर तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तालुक्यातील वरुड,भोसी,अकोली, पाचलेगाव, आडगाव, शेवडी,बेलखेडा या गावात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्याने नदीपात्र फुटून शेत पिकांमध्ये नदीचे पाणी शिरले असुन आडगाव येथील जगन्नाथ खंडागळे या शेतकऱ्याचे दोन एकर भाजीपाला पिक,100 कोंबड्या,2 शेळ्या,बैलजोडी वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तर जिंतूर तालुक्यातील जिंतूर-पाचलेगाव ,जिंतूर- सेनगाव ,जिंतूर-औंढा या मार्गावरील नदी पत्रांना पूर आल्याने या मार्गावरील पूर्ण वाहतूक बंद झाली आहे.तर पाचलेगाव येथील नदीपात्र फुटल्याने  पाणी शेतात घुसून शेतकऱ्यांचे सोयाबीन कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे.


हेही वाचा:


हिंगोलीत पावसाचा हाहाकार; स्कूलबस पाण्यात बुडाल्या, घरात गुडघाभर पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर