Hingoli Crime News : हिंगोली जिल्ह्यातील सवड येथे पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीनेच स्वतःच्या पत्नीवर बलात्कार करण्यासाठी मित्राला घरात पाठवले होते. पतीने पत्नीवर बलात्कार करण्यासाठी मदत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी  पीडित महिलेनं पती आणि आरोपीच्या विरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 


हिंगोली जिल्ह्यातील सवड येथील रहिवासी असलेली पीडित महिला आणि संजय थोरात या दोघांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही काळ संसार व्यवस्थित चालला परंतु दरम्यानच्या काळामध्ये दोघांमध्ये वाद सुरू झाले. या प्रकरणात आरोपी असलेला संजय थोरात नेहमीच त्याच्या पत्नीवर म्हणजेच पीडित महिलेवर संशय घ्यायचा. कुणाशी बोलणं झालं तर का बोलली? शेजार्‍यांकडे गेली तर का गेली? या ना त्या कारणावरून नेहमीच वाद होत होता. दोघांमध्ये सारखी भांडणं व्हायची.  


याच संशयातून पीडित महिलेचा पती संजय थोरात याने त्याचा मित्र माधव जोगदंड या युवकाला बोलून घरात पत्नी एकटी असल्याचा फायदा घेत स्वतःचाच पत्नीवर बलात्कार करण्यासाठी घरात पाठवले. इतक्याच तो थांबला नाही तर स्वतः दरवाजातच थांबून पहारा देत होता. विकृत मानसिकतेचे असलेला हा पीडित महिलेचा पती इतका निर्दयी कसा असू शकतो. की ज्याने स्वतःच्याच पतीवर बलात्कार करण्यासाठी  मित्राला घरामध्ये पाठवले.  


आरोपी माधव जोगदंड हा घरात गेल्यानंतर पीडित महिलेच्या मुलीस चाकूने जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने थेट हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून  घडलेला संपूर्ण  प्रकार सांगितला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून  तात्काळ हिंगोली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माधव जोगदंड आणि पीडित महिलेचा पती संजय थोरात या दोघांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा हिंगोली ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास आता हिंगोली ग्रामीण पोलिस करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी दोन वेगवेगळे पथक रवाना केल्याची माहिती सुद्धा गोपनीय सूत्रांनी दिली आहे.