वर्धा : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की नगराळेला आज न्यायालयात हजर करण्यात आहे. न्यायालयाने आरोपीची न्यायलयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी आज न्यायलयाकडे आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे विक्की नगराळेला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विक्की नगराळेविरोधात राज्यभरातील नागरिकांच्या मनात तीव्र संताप आहे. त्या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरोपीला सकाळीच 6 वाजता न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयीन कोठडीत पाठवताना पुढे गरज भासल्यास पोलीस कोठडी मागू, असं पोलिसांनी आज न्यायालयात सांगितलं आहे.
धक्कादायक! वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
पोलीस कोठडीची मागणी का केली नाही?
न्यायालयीन कोठडी मागण्याचं मुख्य कारण म्हणजे आरोपीची ओळख परेड साक्षीदारांमार्फत करुन घेणे. ही ओळख परेड करुन घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. पोलीस कोठडीत आरोपी असताना ओळख परेड घेता येत नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत पाठवून ओळख परेड घेतली जाणार आहे.
आरोपी विक्की नगराळेला येतेय मुलगी आणि पत्नीची आठवण
हिंगणघाटमध्ये एका लेकीला जाळणाऱ्या आरोपी विक्की नगराळेला आता त्याच्या लेकीची आठवण येत आहे. घटना घडण्याच्या 12 दिवस आधीच आरोपी विक्की मुलीचा बाप झाला होता. आता आरोपीला त्याच्या मुलीची आठवण येते आहे. मला माझ्या मुलीला आणि पत्नीला एकदा भेटू द्या, अशी विनंती तो पोलिसांना करत आहेत.
दरम्यान, आरोपीने घटनेसाठी वापरलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. यामध्ये घटनेच्या वेळी त्याने घातलेले आणि नंतर लपवलेले कपडे आणि शूज, पेट्रोलची बॉटल कापण्यासाठी वापरलेले कटर, आग लावण्यासाठी वापरलेलं लायटर हे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. शिवाय घटनेच्या वेळी आरोपीच्या खिशात फक्त 30 रुपये होते, ते देखील जप्त करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या
- हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; आरोपीला 10 मिनिटासाठी ताब्यात द्या, नातेवाईकांची संतप्त प्रतिक्रिया
- हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीची आई म्हणते मी पीडितेला भेटायला जाणार, तर पत्नी म्हणते...
- माझा विशेष | हिंगणघाटच्या आरोपीचा हैदराबादप्रमाणे 'न्याय' व्हावा?