Sanjay Raut : अफगाणिस्तानच्या भूमीनंतर भारत हा दुसरा देश ठरला ज्या ठिकाणी अमेरिकन लष्कराचं विमान उतरवलं गेलं. आतापर्यंत अमेरिकेतून तीन लष्करी विमाने भारतामध्ये उतरली. आमच्याच भूमीमध्ये भारतीयांच्या पायांमध्ये बेड्या घातल्या गेल्या. जर पीएम मोदी युक्रेन आणि रशियाचे युद्ध थांबू शकतात, त्यांचे आंधळे भक्त वाॅर रुकवा दी पापा म्हणत होते. मात्र, आमच्याच भूमीवर भारतीयांच्या पायामध्ये अमेरिकेने बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. 


कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जात आहे, कुठे आहे सरकार?


संजय राऊत म्हणाले की, 56 इंचाची छाती घेऊन अमेरिकेला गेले, मात्र त्या छातीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी टाचणी टोचली आणि ती लहान करून इकडे परत आले. ते म्हणाले की, दिल्ली असेल, प्रयागराज असेल, कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जात आहे, कुठे आहे सरकार? अशी विचारणा सुद्धा संजय राऊत यांनी केली. इथं पाप करत आहात असा घणाघात संजय राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की शिखांची पगडी उतरवण्यात आली. काय करत आहे भाजप? हा अपमान भाजपला वाटत नाही का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. दिल्लीतील 84 दंगलीवर बोलत आहात चांगली गोष्ट आहे, मात्र हा तुम्हाला अपमान वाटत नाही का? असे ते म्हणाले. आमच्याच भूमीमध्ये बेड्या घातल्या गेल्या असे येते यावेळी म्हणाले.  



दरम्यान समान नागरी कायद्यावरून संजय राऊत यांनी तोफ डागली. विरोधकांना एक कायदा आणि सत्ताधाऱ्यांना एक कायदा असणाताना कसल्या सामान नागरी कायद्याच्या गोष्टी करता असा सवाल सुद्धा संजय राऊत यांनी केला. 


जरांगेंची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे केलं 


संजय राऊत यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरही हल्लाबोल केला. जरांगेंची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे केलं असल्याचे ते म्हणाले. धसांनीच संतोष देशमुख प्रकरणात आंदोलन उभं केल्याचे ते म्हणाले. आकाचे आका शब्द आम्ही आणले नाहीत, असेही राऊत म्हणाले. धस यांनी देशमुख कुटुबीयांच्या अश्रुचा बाजार केल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या