आरोपी साईनाथ लिंगाडे याने काल रात्री 12 वाजताच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळा परिसरात हत्या केली. त्यानंतर आरोपी मठात गेला त्याने महाराजांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि गळा दाबून हत्या केली. त्यानंतर नगदी रक्कम लॅपटॉप चोरी केली. महाराजांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. पण मठाच्या बाहेर गाडी काढताना ती गेटला धडकली. गाडीचा आवाज आल्याने लोक गोळा झाले. तेव्हा लोकांना महाराजांचा मृतदेह आणि ऐवज गाडीत सापडले. संधी साधून आरोपी पळून गेला. आता आरोपीला तेलंगणातील तानुर या गावातून पोलिसांनी अटक केली आहे.
कोरोना व्हायरसच्या जनजागृतीसाठी थेट वरिष्ठ न्यायाधीश रस्त्यावर
नागठाणा येथील ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह आढळून आला. मृताचे नाव भगवान शिंदे (रा. चिंचाळा ता. उमरी) असे असल्याचे समजते. शिंदे हे मठापतीचे सेवेकरी होते. सेवेकरीचाही खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. भगवान शिंदे हा आरोपी सोबत होता की मठातील सेवेकरी होता, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
नागठाणा गावातील दुहेरी हत्याकांडात मोठा खुलासा
नागठाणा गावातील दुहेरी हत्याकांडात संदर्भात नवीन माहिती समोर येतंय. आरोपी विरोधात गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, उमरी पोलिसांनी या तक्रारीला गंभीरपणे घेतलं नव्हते. आरोपीला मोकाट सोडल्याने हत्याकांड झाल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे.
Sadhu Murder Case | नांदेडमध्ये मठाधिपतींसह दोघांची हत्या, पालकमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया